अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा सण उत्सव म्हणजे 'दिवाळी'. गुरुवारच्या दिवशी देशभरात मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी झाली. रोषणाई, आतिषबाजीच्या झगमगाटात कधी सूर्य अस्थाला गेला हे कळलेचं नाही. त्यातच संध्याकाळच्या लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर झाकलेल्या नभावर रंगांची उधळण होत आसमंत बहरून गेले. फटाक्यांपासून होणाऱ्या प्रदूषणाविषयी भरपूर जनजागृती झाली. पण नागरिकांनी त्याकडे कानाडोळा करून फटक्याची आतिषबाजी केली. प्रभू रामचंद्र परतण्याच्या हा उत्सव आहे अशी जनमानसात मान्यता आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये गर्दी आणि भक्तिभाव सुद्धा पाहायला मिळाला. सणाच्या निमित्ताने एकत्र येऊन सण साजरे व्हावेत या सुप्त भावनेपोटी तयार झालेले सण ऊत्सव सोशल मीडियाच्या 'ग्रुप्स' मध्ये येऊन जायबंदी झाले आहेत
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews